Pimpri : पोलीस चौकीसमोर गोंधळ घालणाऱ्या टोळक्यावर गुन्हा

Crime against a mob Rioting in front of a police checkpoint

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या काळात पोलीस चौकीसमोर  जमाव जमवून,  आरडा ओरडा करीत एका टोळक्याने गोंधळ घातला. ही घटना गुरुवारी (दि. 28), सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संत तुकाराम नगर पोलीस चौकीसमोर घडली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत वामन गोटेकर (वय 51), ज्योती प्रशांत गोटेकर (वय 48), चैतन्य प्रशांत गोटेकर (वय 19), सचिन विलास घाग (वय 41), राधिका सचिन घाग (वय 35, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी), सचिन ज्ञानोबा जाधव (वय 41), नितीन ज्ञानोबा जाधव (वय 37, दोघेही रा. त्रिवेणीनगर, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामनाथ विक्रम पालवे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास आरोपी संत तुकाराम नगर येथील पोलीस चौकीसमोर गोळा झाले.

त्यांनी बेकायदा जमाव जमवून गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like