Pimpri : ध्येय गाठण्यासाठी वेळही तितकीच महत्त्वाची  – डॉ. संजीव कुमार पाटील

एमपीसी न्यूज – आपण आपले ध्येय ठरवून घ्यावे आणि त्यानुसार वाटचाल करावी, त्याचप्रमाणे ध्येय ( Pimpri ) गाठण्यासाठी वेळही तितकीच महत्त्वाची आहे, असे मत डॉ. संजीव कुमार पाटील यांनी त्यांच्या व्याख्यानात व्यक्त केले.

ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल मध्ये शनिवारी (दि.26) आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी व्याख्यानासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्युत सहारे , शिक्षिका व 7 वी ते 9 वी चा विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. सर्वात प्रथम सरांचे भेट कार्ड देऊन  डॉ.पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

Pune : 83 वर्षांच्या अनुभवातून तयार झालेल्या गणपती मूर्तीच्या रविंद्र मिश्रणाला मिळाले पेटंट

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, यशस्वी जीवनाची सात सूत्रे आहेत. या सूत्रांचे विद्यार्थ्यांनी अनुकरण करणे ( Pimpri ) कसे गरजेचे आहे हे त्यांनी प्रत्येक सूत्रा नंतर विविध उदाहरणे देऊन  स्पष्ट केले. आपण आपले ध्येय ठरवून घ्यावे आणि त्यानुसार वाटचाल कशी करावी याचे देखील स्पष्टीकरण सरांनी केले.

त्याचप्रमाणे ध्येय गाठण्यासाठी वेळही तितकीच महत्त्वाची आहे हे त्यांनी सांगितले सरांनी 24 तासाची विभागणी  करून शेवटच्या तासात लिहिणे, वाचणे वाचलेल्या गोष्टींची चिंतन करणे त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

डॉ. पाटील यांनी  विद्यार्थ्यांकडून त्यांची ध्येय जाणून घेण्याचा प्रयत्न केला व ध्येय निश्चित करताना त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे हे सांगितले. आपल्या शेवटच्या सूत्रात मान देणे, आई-वडिलांचा सन्मान करणे याविषयी  सखोल विचार मांडणी केली. प्रत्येक सूत्र आत्मसात करताना आई-वडिलांचा पाठिंबा असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रत्येक कामाची सुरुवात करताना आई-वडिलांना वाकून  नमस्कार करणे गरजेचे आहे हे त्यांनी आधी अगदी सोप्या पद्धतीने सांगितले.

मुलांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत जिवनात बदल करत ध्येय गाठण्याची इच्छा ( Pimpri ) व्यक्त केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.