Pune : 83 वर्षांच्या अनुभवातून तयार झालेल्या गणपती मूर्तीच्या रविंद्र मिश्रणाला मिळाले पेटंट

पुण्यातील धोंडफळे हे पेटंट मिळवणारे पहिले मूर्ती कलाकार

एमपीसी न्यूज – कला ही अंगभूत असते, पिढ्यानपिढ्या ती पुढे ही जाते. मात्र याच कलेला ( Pune ) नाविन्याची जोड देत धोंडफळे परिवाराने 83 वर्षांच्या मेहनतीनंतर मूर्तिकलेचे पेटंट मिळवले आहे. धोंडफळे हे पहिले मुर्तीकार आहेत ज्यांना मुर्तीकलेसाठी पेटंट मिळाले आहे. त्यांचे पर्यावर्णपुरक व अनोख्या मुर्ती मिश्रणाची थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दखल घेतली आहे. हे मिश्रण खास गणपतीच्या मुर्तीसाठी बनवले गेले आहे. या मिश्रणाला अभिजीत यांनी त्यांच्या वडिलांचे नाव रविंद्र मिश्रण असे नाव  दिले आहे.

अभिजीत रवींद्र धोंडफळे यांनी ते पेटंट मिळवले आहे. जुलै 2019 साली पेटंट रजिस्ट्रेशन केले त्याला 6 जून 2023 रोजी ग्रॅंट मिळाले. यामुळे अभिजीत धोंडफळे हे मूर्तीकलेत पेटंट मिळवणारे पहिले कलाकार बनले आहेत. शाडू माती, गाळाची माती, लाकडी भुसा यांचे एक चमत्कारी मिश्रण बनवून त्यांनी एक ( Pune ) पर्यावरण पुरक, टिकाऊ गणपतीची मूर्ती बनवली आहे.

या मूर्तीच्या मिश्रणावर अनेक प्रयोग केले गेले आहेत. सिव्हील इंजिनियरींग टेस्ट लॅबमध्ये देखील याची तपासणी झाली आहे. यात हे मिश्रण खरे उतरले आहे. प्लास्टर ऑफ पॅरीस व शाडू माती यांच्या तुलनेत टिकून राहण्याची क्षमता व विरघळण्याचा कालावधी या बाबीत हे मिश्रण सरस ठरले आहे.

काय आहे रविंद्र मिश्रण 

या मिश्रणात गाळाची माती, शाडू माती, सॉफ्ट राईस ब्रान म्हणजेच मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा हे घटक योग्य प्रमाणात घ्यावे लागतात. याची वैशिष्ट्ये पहायची झाली तर तुलनेत वजनाला हलके, इतर मुर्तीप्रमाणे बारीक नक्षी व रंगकाम शक्य, शाडू माती पेक्षा लवकर सुकते, विरघळण्याची क्षमता देखील चांगली आहे.

धोंडफळे हे मागील 83 वर्षापासून म्हणजे 1940 पासून मूर्ती क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची चौथी पिढी म्हणजेच अभिजीत यांची मुलगी दीप्ती देखील बाप्पांच्या सेवेत आहे. अभिजीत यांच्या आजोबांनी  पांगुळ आळीचा गणपती पर्यावरणपूरक पेपर पल्प पासून 1955 साली बनवला होता. जो आजही चांगल्या अवस्थेत आहे.

Pune : 83 वर्षांच्या अनुभवातून तयार झालेल्या गणपती मूर्तीच्या रविंद्र मिश्रणाला मिळाले पेटंट

त्यानंतर वडील रविंद्र धोंडफळे यांनीही पेपर पल्पचे अनेक गणपती बनवले जे पुण्यात व पुण्याबाहेर ही विकले गेले. आता या कलेला तिसरी पिढी वेगळ्या रुपात जगासमोर मांडू पहात आहे. मागील 23 ते 24 वर्षापासून धोंडफळे हे (Pune) मूर्ती कलेची कार्यशाळा चालवत आहेत.याचेच पुढचे पाऊल म्हणजे हे रविंद्र मिश्रण आहे.

ज्याचे त्यांना आजमितीला पेटंट देखील मिळाले आहे. यासाठी वकील म्हणून अडव्होकेट गौरी भावे यांनी कायदेशीर जबाबदारी पार पाडली तर लॅबसाठी रवी रानडे यांनी सहकार्य केले.

या विषयी बोलताना अभिजीत धोंडफळे म्हणाले की, मुळात या पेटंटचे नाव Eco-Friendly Water And Strong Media Mixture For Sculpture & Idols म्हणजे हे केवळ तुमच्या आमच्या घरापुरते नाही तर संपूर्ण देशाला मोठी मदत करणारे ठरणार आहे.

त्यामुळे हे पेटंट मी देशाला समर्पीत करत आहे. पीओपी हे घातक आहे कारण यात जिप्सम 220 अंश सेल्सीअस पर्यंत तापवून  मग त्याची पुड केली जाते. ते पाण्याच्या संपर्कात आले की त्याची रासायनीक प्रक्रिया होते. याला घातक क्रीयेला पर्याय म्हणून रविंद्र मिश्रण बनवले आहे.

जे रसायन विरहीत आहे, टिकाऊ वकिफायतशीर आहे, ते तुम्ही नंतर झाडांना कुंड्यात देखील वापरू शकता, पाण्यात गेल्यानंतरही त्याचे नैसर्गिक रित्या विघटन होते. त्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी हे एक वरदान ठरेल. याचे कोणी मास प्रोडक्शन करणार असेल किंवा शासनाला याची गरज वाटली तरी देखील मी सल्लागार म्हणूम काम करण्यास तयार आहे. कारण हे केवळ माझ्या पुरत मर्यादीत न राहता ते सर्वांच्या उपयोगात येणे गरजेचे ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.