Pune : महाविकास आघाडी युवक शाखेतर्फे मणिपूर हिंसाचार विरोधात ‘एक सही विरोधाची…..संतापाची…’ अभियान

एमपीसी न्यूज – कोथरूड गावठाण येथे महाविकास आघाडीतर्फे  (Pune)  मणिपूर मधील हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात “एक सही मणिपूर हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधाची.. संतापाची..” अभियान सोमवारी (दि.28) राबवले गेले.

Maharashtra : ई-केवायसी केलेल्या 3 लाख शेतकऱ्यांकरिता 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित – अनिल पाटील

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक गिरीश गुरनानी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा यांनी केले होते, तर राम थरकुडे युवा सेना प्रमुख पुणे शहर आणि  राज जाधव अध्यक्ष NSUI कोथरूड यांनी कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवकांचा व परिसरातील नागरिकांचा सहभाग होता.

यावेळी प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश आण्णा काकडे,आमदार रवींद्र धंगेकर,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, संगीताताई तिवारी, आमिर शेख,स्वप्नील दुधाने,योगेश मोकाटे,किशोर कांबळे आदी उपस्थित (Pune) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.