Pimpri : पुलवामा आतंकी हल्ल्यातील शहिद जवानांना विविध संस्था, संघटनांच्या वतीने श्रध्दांजली

एमपीसी न्यूज – जम्मू – काश्मीरच्या पुलवामा जिल्हयात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केन्द्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) ४० जवान हुतात्मा झाले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संस्था आणि संघटनाच्या वतीने शहीद जवांनाना श्रध्दांजली वाहण्यात आली.

भ्याड हल्ल्याचा आपल्या न्यू सिटी प्राईड स्कूलच्या वतीने ‘सीआरपीएफ’च्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिष, भगवान गोडांबे, दत्तात्रय कुटे, संजय कुटे, राकेश भास्कर, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

  • पिंपरी-चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या अजमेरा येथील कार्यालयात पुलवामा आतंकी हमल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वानी मेणबत्ती लावून आणि मौन धारण करून आदरांजली वाहिली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे यांनी सांगिलते. बेसावध सीआरपीएफ सैनिकांवर हल्ला करणे हे आत्मघातीपणा आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष निगार बारस्कर ह्यांनी ह्या भ्याड कृत्याचे कडकडून निषेध करून सांगितले की, ह्यां आतंकवाद्यांना आता धडा शिकवलंच पाहिजे अशी वेळ आलेली आहे.

  • पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, समोरासमोर भारतीय सैन्य दलाचा मुकाबला करण्याची क्षमता नसणार्यांनी हा जो भ्याड हल्ला प्रवासात असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांवर केला ह्याचा तीव्र निषेध करतो. ह्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे सचिव आयुष मंगल ह्यांनी आपली भावना स्वरचित कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली.

पिंपळे सौदागरमधील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहीद जवांनाना श्रध्दांजली वाहिली. चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक संदीप काटे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थित होता.

सिंधी समाजाच्या सेंट्रल पंचायतीच्या वतीने श्रध्दांजली
पुलवालामध्ये भारतीय सैनिकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्याभ्याड हल्ल्याचा निषेध आणि वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांना पिंपरी येथील सिंधी समाजाच्या सेंट्रल पंचायतीच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी पंचायतचे अध्यक्ष शिवनदास पमनानी, गोपी आसवानी, श्रीचंद नागानी, पेहबाज लोकनानी, भगवान खत्री, मुखीसिंग सरदार, मनोहर जेठवानी, अजित कंडावानी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.