Vadgaon Maval : जनसंघ, भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला

एमपीसी न्यूज -मावळचे दिवंगत आमदार दिगंबर भेगडे हे अजातशत्रू होते. त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन एकता आणि समाजसेवेचे राजकारण केले. राजकीय जीवनात चिखलफेक होत असते. मात्र दिगंबर दादा यांच्याबाबत हे कधीही घडले नाही. ते अजातशत्रू होते. संवाद आणी विचार या अर्थाने ते जीवन जगले. जनसंघाचा हाडाचा कार्यकर्ता, भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता, मावळ परिसराचा विकास घडवून आणणारे नेतृत्व, सगळया लोकांच्या जीवनाशी समरस होऊन विरोधकांनीही त्यांच्याबद्दल गौरवाचे शब्द काढावेत असे निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न नेतृत्व आपण गमावले आहे, असे मत माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले.

मावळचे दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा वडगाव मावळ येथे झाली. त्यावेळी राम शिंदे बोलत होते. शोकसभेला प्रचंड गर्दी होती कै. दिगंबर भेगडे यांच्या आठवणीने काहींना अश्रू अनावर झाले.

याप्रसंगी आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री मदन बाफना, राम शिंदे,बाळा भेगडे,भास्कर म्हाळसकर, शंकर शेलार, माऊली दाभाडे, गणेश भेगडे,सूर्यकांत वाघमारे,गणेश खांडगे, मंगल महाराज जगताप,ॲड रवींद्र दाभाडे, चंद्रकांत सातकर,सोपान म्हाळसकर,बाळासाहेब नेवाळे, गणेश ढोरे,रुपेश म्हाळसकर,दिलीप ढमाले, गणेश काकडे, बाळासाहेब काशीद, सुनील चांदेरे,विठ्ठल शिंदे, आण्णासाहेब भेगडे, रवींद्र भेगडे, मनोहर भेगडे, प्रशांत भेगडे तसेच सर्वपक्षीय, सर्व क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Pimpri News: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक हल्ल्याचा भाजपच्या वतीने निषेध

सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे नेतृत्व,शेवटच्या क्षणापर्यंत विकासाचा विचार करणारे सहृदय व्यक्तिमत्त्व राजकारणामधील अजातशत्रू हरपल्याने पोकळी निर्माण झाली आहे. सर्वांच्या मदतीला धावून जाणारे असल्याने शोकसभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहेत. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे अशी
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी श्रद्धांजली वाहिली.

आमदार सुनील शेळके म्हणाले दिगंबर दादा यांच्या निधनाच्या बातमीवर क्षणभर विश्वासच बसला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय राहणारे दिगंबर दादा यांचा राज्यकर्ते व लोक प्रतिनिधींनी आदर्श घ्यावा. राजकीय जोडे बाजूला ठेवून निवडणूक झाल्यावर एकत्र येऊन विरोधकांनाही आपलेसे करणारे नेतृत्व, दिगंबर दादांसारख्या ज्येष्ठ मंडळीनी तालुक्यात सलोख्याचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या जाण्याने तालुक्याची मोठी हानी झाली.

माजी राज्यमंत्री मदन बाफना म्हणाले मनाचा मोठेपणा असणारे, सर्वांना आपलंस करणारे. राजकीय, अध्यात्मिक व शेतकरी कुटुंबातील सरळ निर्मळ स्वभावाचे दिगंबर दादा मावळातील जनतेला चटका लावून गेले. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कायमच पुढाकार घेणारे दिगंबर दादा गेल्याने तालुक्यात उणीव भासत आहे.

यावेळी शाब्दिक श्रद्धांजली माजी राज्यमंत्री राम शिंदे, माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, गणेश ढोरे, गणेश खांडगे, राजेश खांडभोर, बाळासाहेब काशीद, सोपान म्हाळसकर, रामनाथ वारींगे, तानाजी काळभोर, रुपाली दाभाडे, सुरेखा जाधव, सुमित्रा जाधव, सायली बोत्रे, आशिष ठोंबरे, विजय सुराणा,मुकुंद तनपुरे,विकास कंद आदींनी वाहिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम कदम यांनी केले तर सूत्रसंचालन शांताराम कदम व अनंता कुडे यांनी केले. आणि भेगडे परिवाराच्या वतीने संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांनी ऋण व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.