Pimpri News: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक हल्ल्याचा भाजपच्या वतीने निषेध

एमपीसी न्यूज: पुणे जिल्हा पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील झालेल्या शाईफेक हल्ल्याचा पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी (भाजप) वतीने निषेध करण्यात आला.

पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी (भाजप) यांच्या वतीने निषेध सभा आज रविवार, 11 डिसेंबर संध्याकाळी शहर भाजप कार्यालयाबाहेर करण्यात आली.

Morya Mahotsav Live : मोरया गोसावी महोत्सव दिवस दुसरा

यावेळेस पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी (भाजप) अध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ही निषेध सभा घेण्यात आली.

यावेळेस भाजपचे शहरातील माजी महापौर व नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व भाजप पदाधिकारी आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुकतांना निवेदन द्यायला रवाना झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.