Pimpri News : मातृसेवा संस्थेत यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली

एमपीसी न्यूज – मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त संस्थेतील वृद्ध व अपंगांनी आदरांजली वाहिली.

संस्थेचे संस्थापक सुहास गोडसे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचेे नाव जगाच्या इतिहासात अजरामर केले. कराड सारख्या शहरात शैक्षणिक गंगा आणली. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना शिक्षणात प्रगती करून देशाचे नेतृत्व केलेल्या या शिल्पकाराचे स्मरण युवकांनी ठेवले पाहिजे.

दिलीपराव ढमाळ, संस्कृती गोडसे, ठकू शेळके, अशोक वाघ ज्येष्ठ तसेच नागरिकांनी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.