BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : व्हॉल्व फुटल्याने फुगेवाडीत पाणीच पाणी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – फुगेवाडीत येथे व्हॉल्व फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. व्हॉल्व फुटल्याने आज (शुक्रवारी) सकाळी पाणी वाहून वाया गेले आहे. तर, दुसरीकडे फुगेवाडीतील नागरिक पाण्यासाठी सातत्याने आंदोलन करत असताना पाणी वाया गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, व्हॉल्व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

दापोडी, फुगेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांसह आंदोलन केले होते. अगोदरच विस्कळीत पाणीपुरवठा असताना पाणी वाया गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

फुगेवाडीतील वॉलमधून पाणी वाहण्याचे प्रमाण कमी होते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी व्हॉल्व दुरुस्त केला होता. आज पुन्हा तोच व्हॉल्व लिकेज झाला आहे. त्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.

याबाबत कार्यकारी अभियंता रवींद्र पवार म्हणाले, फुगेवाडीतील व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी केले होते. आज तो व्हॉल्व लिकेज झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

HB_POST_END_FTR-A2

.