HB_TOPHP_A_

Nigdi : निगडीत फेब्रुवारीत बालशाहीर पोवाड्याचे आयोजन

स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य, ३१ जानेवारी २०१९ पर्यंत नाव नोंदणी सुरु

97

एमपीसी न्यूज -सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी (दि. 6 फेब्रुवारीला) बालशाहीर पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

HB_POST_INPOST_R_A

निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, सेक्टर नंबर २५ येथे सकाळी नऊ वाजता स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. इयत्ता पाचवी ते दहावी या गटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून संघामध्ये मुख्य शाहीर आणि इतर पाच साथीदार सहभाग घेऊ शकतात.

संयोजकांच्या वतीने प्रत्येक संघाला संवादिनी आणि ढोलकी उपलब्ध करून दिली जाईल. सादरीकरणासाठी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केलेला असून ऐतिहासिक, सामाजिक अथवा राष्ट्रीय प्रबोधन यापैकी कोणत्याही एका विषयावरील पोवाड्याचा समावेश असावा.

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देणार
या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणी ३१ जानेवारी २०१९ पूर्वी करणे आवश्यक आहे. स्पर्धा संपल्यानंतर लगेच बक्षीस वितरण समारंभ होणार असून त्यात विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये ५०००/- आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक रुपये ३०००/- आणि स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक रुपये १५००/- आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. याशिवाय स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

इच्छुकांना सहभाग घेण्याचे आवाहन
नाव नोंदणीसाठी -शाहीर प्रकाश ढवळे, प्लाट नंबर २९९,सेक्टर नंबर २७,निगडी प्राधिकरण,पुणे – ४११ ०४४. या पत्त्यावर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२५८६६८९ वर सकाळी ९:०० ते ११:३० आणि सायंकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत संपर्क साधावा. या स्पर्धेत आपली शाळा किंवा संस्थेच्या वतीने सहभाग नोंदवून शाहिरी चळवळ वृद्धिंगत करावी, असे आवाहन महाराष्ट्र शाहीर परिषद, प्रमुख कार्यवाह आणि पुणे जिल्हाध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: