Pimpri : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – आज अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे रावेत पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे रावेत पंपिंग स्टेशनमधील सर्व पंप्स बंद झाल्याने पाणी उपसा बंद झाला आहे. त्यामुळे शहराचा आज (दि. 13 एप्रिल 2019)चा संध्याकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

तसेच रविवारी (दि. 14 एप्रिल 2019) रोजीही पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा आणि जल नि:सारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले आहे.

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा आणि जल नि:सारण विभागाच्या वतीने पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विभाग प्रयत्न सुरु आहेत. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहनही तांबे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.