Pimpri : जागतिक फार्मासिस्ट दिवस समाजपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिका फार्मासिस्ट संघटनेतर्फे जागतिक फार्मासिस्ट दिवस विविध समाजपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भोसरी येथील अंधशाळेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वैष्णवी जगताप हिला मानपत्र देवून गौरविण्यात आले. नासा येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल शौर्य गडकरी याचा, फार्मासिस्टच्या पाल्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला.

Lonavala : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय चाणक्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल ऑफ फार्मसी एमआयटीचे डॉ. भानुदास कुचेकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप , उपायुक्त विठ्ठल जोशी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती औषध भंडाराचे व्यवस्थापक एम. ए. मलिक होते. या कार्यक्रमासाठी महापालिकेतील सर्व फार्मासीस्ट उपस्थित होते. दीप प्रज्वलन आणि धन्वंतरीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

डॉ. कुचेकर यांनी जागतिक फार्मासिस्ट दिन का साजरा केला जातो. त्याचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. तसेच आधुनिक आर्टिफिशियल इंजीनियरिंगच्या उपयोगाने भविष्यात रुग्णांना कशाप्रकारे मदत करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी कोविडच्या काळामध्ये फार्मासिस्टनी केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. उपायुक्त जोशी यांनी ताण तणाव विरहित कामकाज कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. भविष्यकाळात महापालिकेमध्ये फार्मासिस्ट यांची संख्या वाढवण्याचे आश्वासन दिले.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांनी फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका यावर प्रकाश टाकला. फार्मासिस्ट करीत असलेल्या रुग्णसेवेबद्दल समाधान व्यक्त केले. अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दादेवार यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल कौतुक केले. अधिष्ठाता डॉ. वाबळे यांनी रुग्णालयामध्ये फार्मसी विभाग हा रुग्णांसाठी शेवटचा विभाग असल्याने रुग्णांना कशाप्रकारे औषध वाटप करावे. त्यांचे समुपदेशन करावे याबद्दल मार्गदर्शन केले.

कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष झिंजुर्डे यांनी फार्मासिस्ट यांच्या समस्यांबद्दल प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पिंपरी-चिंचवड महापालिका फार्मासिस्ट संघटनेचे अध्यक्ष शितल माने यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. फार्मासिस्ट विद्या किनेकर, दुदमल जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेंद्र गाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संघटनेचे उपाध्यक्ष नारायण जायभाय यांनी सूत्रसंचालन केले. तर, सचिव दीपक कुदळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीस्वतेसाठी दत्तात्रय वायदंडे, श्याम चव्हाण, राजेश निकम, तानाजी गवंड, स्वाती काळे,खजिनदार सोमनाथ स्वामी, शहाजी जमादार, गणेश दरेकर यांनी विशेष सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.