Lonavala : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एका 35 वर्षीय व्यक्तीने नऊ (Lonavala)  वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी (दि. 25) सायंकाळी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

विजय शशिकांत मालकोटे (वय 35, रा. उर्से, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय याने फिर्यादी यांच्या नऊ वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

मागील दोन दिवसांपूर्वी लोणावळा येथे दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस (Lonavala)  आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.