Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदराव कुलकर्णी यांना पितृशोक

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदराव कुलकर्णी यांचे वडील रामराव कुलकर्णी (Pimpri) यांचे आज (मंगळवारी) वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे वय 90 वर्षे होते.

Pune : जे पी नड्डा साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी आले असताना मांडवात लागली आग

त्यांच्या पश्चात 5 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुलकर्णी कुटूंबीय कर्नाटक राज्यातील आहे. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील सिरसगीत रामराव कुलकर्णी हे सामाजिक कार्य आणि शेती करत होते. गावातील प्रतिष्ठीत नागरिक होते. रामराव कुलकर्णी काही दिवसांपासून अल्पशा आजाराने आजारी होते. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.27) आठ वाजता मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.