Maharashtra : आळंदीमधील कंत्राटी शिक्षकाने शिक्षक भरतीच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या इमारतीवरून मारली उडी

एमपीसी न्यूज -राज्यात शिक्षक भरतीच्या ( Maharashtra) मुद्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आळंदीमधील रणजीत आव्हाड या कंत्राटी शिक्षकाने आज (26 सप्टेंबर) दुपारी मंत्रालयाच्या इमारतीवरून खाली उडी मारली.

त्यानंतर हा तरुण मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर पडला. त्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तरुणाला जाळीबाहेर काढून ताब्यात घेतले. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Pune : जे पी नड्डा साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी आले असताना मांडवात लागली आग

रणजीत आव्हाड हा आळंदीमध्ये कंत्राटी शिक्षक आहे. त्याचे मुळगाव आंबेजोगाई आहे. प्रकल्पग्रस्त आहे, त्यामुळे शेतीही फारशी नाही आणि नोकरीही नाही. तिसऱ्या पिढीमध्ये एकालाही शासकीय नोकरी नसल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी अशी मागणी या तरुणाने केली ( Maharashtra) आहे.

हा तरुण उसतोड कामगार आणि प्रकल्पग्रस्त असल्याने असल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मंत्रालयातील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षा जाळीवर उडी मारत या तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात ( Maharashtra) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.