Pune : जे पी नड्डा साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी आले असताना मांडवात लागली आग

सुदैवाने कोणतीही जखमी वा जिवितहानी नाही

एमपीसी न्यूज – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी आले असताना  मंडळाच्या मांडवात आग लागल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. आग लागली त्याच दरम्यान जोराचा  पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटांत विझली व मोठी दुर्घटना टळली व जखमी वा जिवितहानी झाली नाही.

Pune : जे पी नड्डा साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी आले असताना मांडवात लागली आग

आंबीलोढा कॉलनी नजीक साने गुरुजी तरुण मंडळाने गणेशोत्सवासाठी  देखावा म्हणून महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. आज (26 सप्टेंबर ) ला  या मंडळाच्या गणपतीची रात्रीची आरती  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते चालू असताना त्याच मंदिराच्या कळसाला आग लागली .

त्यामुळे  जे पी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. आग लागली त्याच दरम्यान जोराचा  पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटांत विझली व मोठी दुर्घटना टळली. तसेच जनता वसाहत, एरंडवणा अग्निशमन केंद्र येथून व अग्निशमन मुख्यालयातून अशी एकूण चार अग्निशमन वाहने तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली होती.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की,   देखावा म्हणून केलेल्या महाकाल मंदिराच्या कळसापासून आगीची सुरवात झाली असून आग वाढत आहे.

जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत व शहरात गणपती उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक असल्याने तातडीने मंडपाच्या मागील बाजूने शिडी लावत वर चढून चारही बाजूने होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा केला.

सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवत पुढील धोका दूर केला. सुदैवाने कोणी जखमी नाही. अधिक माहिती घेतली असता आग फटाक्यांमुळे लागल्याचे समजले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.