Pimpri: शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग

Shiv Sena group leader Rahul Kalate infected with corona:सहाय्यक आयुक्तानांही कोरोनाची बाधा

सहाय्यक आयुक्तानांही कोरोनाची बाधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांचे आज (सोमवारी) रात्री रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  आजपर्यंत पाच नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तालाही आज कोरोनाची लागण झाली आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाने लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचा-यांनाही विळखा घातला आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मोठी मदत केली होती. जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.

तसेच महापालिकेतील विविध बैठकांना देखील ते हजर राहत असत. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता.

त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट  पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तालाही आज कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, यापूर्वी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे, शैलेश मोरे,  चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना आणि च-होलीतील राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  तर, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) निधन झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.