Talegaon : मावळात आज 10 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; तालुक्यात एकूण 72 सक्रिय कोरोना रुग्ण

10 patients in Maval today corona positive; A total of 72 active corona patients in the taluka : या कोरोनाबाधित रुग्णांना राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्र कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यातील माळवाडी येथील एकाच कुटुंबातील 4, तर सोमाटणे व लोणावळा येथील प्रत्येकी 2, तळेगाव व कामशेत येथील प्रत्येकी एक अशा एकूण 10 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. तालुक्यात आतापर्यंत एकूण- 145 (शहरी- 56 व ग्रामीण-89) जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 67 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात 72 सक्रिय कोरोना रुग्ण असून मृतरुग्णांची संख्या 6 झाली आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

माळवाडी येथील कोरोनाबाधितांमध्ये 35 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगा, 9 वर्षीय मुलगी चार व्यक्तींचा समावेश आहे. हे चारही जण लक्षणे जाणवू लागल्याने दि. 3 जुलै रोजी रावेत येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.

तेथे दि. 4 जुलैला त्यांचा खाजगी लॅबद्वारे स्वॅब घेण्यात आला. आज त्यांचा अहवाल कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना सध्या राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्र कोविड केअर सेंटर तळेगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

दि. 3 जुलै रोजी सोमाटणे येथील 64 वर्षीय पुरुष पाॅझिटिव्ह आले होते. त्यांची 58 वर्षीय पत्नी, 29 वर्षीय पुरुष मुलगा, सोमाटणे व 37 वर्षीय मुलगी, 08 वर्षीय मुलगा नातू यांचा दि. 4 जुलैला स्वॅब घेण्यात आला होता.

आज या सर्वांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या सर्व रुग्णांना तळेगाव येथील सुगी पश्चात केंद्र कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.

दि. 01) जुलै रोजी रियो कॉलनी तळेगाव दाभाडे येथील वय 42 वर्षीय व्यक्ती पाॅझिटिव्ह आले होते. त्यांच्या निकटच्या संपर्कातील 47 वर्षीय व्यक्तीचा दि. 4 जुलैला स्वॅब घेण्यात आला होता. आज त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

त्यांना उपचारार्थ राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्र कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कामशेत येथील 45 वर्षीय महिलेला लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्या तळेगाव जनरल रूग्णालयात उपचारास गेल्या असतादि. 4 जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.

त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल आज पाॅझिटिव्ह आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.