Pimpri: कोरोनाचा कहर ! आज 581 नवीन रुग्णांची भर, 363 जणांना डिस्चार्ज

Corona's havoc! Today 581 new patients added, 363 discharged : आजपर्यंतची कोरोनाची रुग्णसंख्या 4861 वर पोहोचली आहे.

एमपीसीन्यूज न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 573 आणि शहराबाहेरील 8 अशा 581 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 363 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या 4861 वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दररोज रुग्णवाढीचा उच्चांक होत आहे. मागील काही दिवसांपासून 300 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. आज तर शहरातील तब्बल 573 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

महापालिका हद्दीबाहेरील 8 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर, आज उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 363 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

खेड येथील 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे वायसीएममध्ये मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 4861 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2906 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 67 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 32 अशा 99 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1863 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 614

# पॉझिटीव्ह रुग्ण – 581

#निगेटीव्ह रुग्ण – 505

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1392

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2356

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 710

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 4861

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1863

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 100

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 2906

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26487

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 79839

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like