Pune : दिवाळीच्या किल्ल्याबरोबरच साकारले नियोजनबद्ध शहर (व्हिडिओ)

353

एमपीसी न्यूज- दिवाळी म्हटले की फटाके वाजवणे आणि किल्ला बनवणे हा बच्चे कंपनीचा आवडता उद्योग. पण शाहुनगरमधील एका आयटी इंजिनियरने आपल्या मित्रांना घेऊन एक आकर्षक किल्ला आणि त्या भोवती एक खेडेगाव आणि शहर उभे केले आहे. यामधून शहरी आणि ग्रामीण जीवनाचे चित्र छानपणे दिसून येते.

HB_POST_INPOST_R_A

शाहूनगर येथे राहणारा ओंकार येशवेकर आणि त्याच्या मित्रमंडळींनी हा किल्ला साकारला आहे. साधारणपणे १० फूट बाय १२ फूट जागेमध्ये एका कोपऱ्यामध्ये मातीचा किल्ला उभा केला आहे. त्यावर नेहमीप्रमाणे सिहासनावर विराजमान शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, पहारेकरी दिसतात. गडाच्या पायथ्यापासून एक नदी वाहत आहे. नदीच्या एका बाजूला छोटे खेडेगाव आहे तर दुसऱ्या बाजूला नियोजनबद्ध शहर दिसते.

खेडेगावात शेतावर काम करणारे शेतकरी, हिरवीगार शेते दिसतात तर एका ठिकाणी तमाशाचा फड रंगला असून त्यामध्ये लोक लावणीचा आनंद घेत आहेत.
शहरामध्ये एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते, रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारी, रेल्वेमार्ग, मोठ्या इमारती, बंगले, कुस्तीचे मैदान, रेल्वे स्टेशन, फिश मार्केट, क्रिकेट मैदान, चर्च, विमानतळ असे विलोभनीय दृश्य दिसते.

ओंकार येशवेकर, सुरेश येशवेकर, निशांत जगताप, साक्षी जगताप, अपूर्वा जगताप यांनी ३-४ दिवसात हा किल्ला साकारला आहे. किल्ल्याबरोबरच आजच्या पिढीला ग्रामीण आणि शहरी जीवनाबद्दल माहिती व्हावी यासाठी आम्ही हा किल्ला साकारला असे ओंकार येशवेकर म्हणाला.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: