Garbage collection : प्लेगेथॉन मोहिमेअंतर्गत  इंद्रायणीनगरमध्ये 350 किलो कचरा संकलित

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणीनगर येथील स्पाईन सिटी सर्कल (Garbage collection) या ठिकाणी आज (गुरुवारी) प्लेगेथॉन मोहिम राबविणेत आली. मॉर्निंगवॉकला येणारे शेकडो नागरिकांनी यात सहभाग नोंदविला. या स्वच्छता प्लेगेथॉन मोहिमेध्ये 350 किलो कचरा संकलित करण्यात आला.

इंद्रायणीनगर येथील स्पाईन सिटी सर्कल या ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली. या मोहिमेमध्ये शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, व मोशी, इंद्रायणीनगर या ठिकाणचे नागरिक उपस्थित होते. क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी स्वच्छते विषयक व प्लॅस्टिक बंदी (Garbage collection) विषयक तसेच कचरा विलगीकरणाबाबत मार्गदर्शन केले. आपले पिंपरी- चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. या उपक्रमात उपस्थित नागरिकांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Pune news : बैलगाडा शर्यत अंतिम लढ्याच्या तयारीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

सहाय्यक आरोग्याधिकारी तानाजी दाते, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, प्रभाग क्र 8 चे आरोग्य निरीक्षक क्षितीज रोकडे, आरोग्य निरिक्षक वैभव घोळवे तसेच महापालिका अधिकारी (Garbage collection) आणि कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन या मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.