PM Modi Pune Live : टिळकांनी ‘स्वदेशी’चा नारा दिला, तर मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – टिळकांनी ‘स्वदेशी’चा नारा दिला. तर मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला. मोदी यांनी (PM Modi Pune Live) एकदा ठरवलं की ते काम पूर्ण करतातच. काश्मीर  370 कलम, राम मंदिर, देशातील गरिबांच्या कल्याणाचा आणि सर्वांगीण विकासाचा विषय असू द्या, ते पूर्ण करतातच, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, दीपक टिळक, गीताली टिळक, रोहित टिळक, डॉ. प्रणिती टिळक आदि उपस्थित होते.

ब्रिटीशांविरोधात लढताना (PM Modi Pune Live) लोकमान्य टिळकांच्या शब्दांना धार येत असे. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केला जात आहे. याचा आनंद आहे. हा पुरस्कार आजवर अनेक मोठ्या लोकांना दिला गेला आहे.

PM Modi Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी ‘भारत विश्वगुरु व्हावा’ यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केला संकल्प

जागतिक पातळीवर मोदी यांनी केलेले काम लक्षात घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे मन ओळखणारे पंतप्रधान म्हणून देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचा गौरव केला.

टिळकांनी स्वराज्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यामध्ये आपल्याला किती यश आले, हे आपल्याला माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात स्वराज्याचे सुराज्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. देश-विदेशात मोदी यांचे नाव आदराने घेतले जाते. मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था जगात दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली.

ज्या इंग्रजांना देशातून हद्दपार करण्यासाठी टिळकांनी (PM Modi Pune Live) लढा उभारला. त्या ब्रिटीश अर्थव्यवस्थेला देखील भारताने मोदी यांच्या नेतृत्वात मागे टाकले आहे. ही आनंदाची बाब आहे. टिळकांनी ‘स्वदेशी’चा नारा दिला. तर मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला. मोदी यांनी एकदा ठरवलं की ते काम पूर्ण करतातच. काश्मीर माशील कलम 370, राम मंदिर, देशातील गरिबांच्या कल्याणाचा आणि सर्वांगीण विकासाचा विषय असू द्या, ते पूर्ण करतातच.

सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल हे अंतिम ध्येय मोदी यांनी ठेवले आहे. लोकमान्य टिळकांच्या कल्पनेतील बलवान देश घडविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.