Maval : डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत तर सरपंच शेलार यांना समाजभूषण पुरस्कार

एमपीसी न्यूज – स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य (Maval) यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने डाहुली ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. याच ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव शेलार यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि 30) अहमदनगर येथे पार पडला. आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील तसेच सुप्रसिद्ध कृषी व हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पावसे, खांडी विविध विकास सोसायटीचे संचालक दशरथ आलम, तंटामुक्ती अध्यक्ष डाहुली सुधीर आलम,बाळासाहेब ठिकडे, उपसरपंच सुभाष आलम, सुभाष देशमुख, रवि कोलते,सोमनाथ जाधव, सदस्य ग्रामपंचायत अंजनाबाई ठिकडे, वडेश्वरचे सरपंच गुलाब गभाले, खांडीचे सरपंच अनंता पावसे,विक्रम हेमाडे, राघु तळपे, रोहन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

एकाचवेळी ग्रामपंचायत आणि सरपंच  या दोघांनाही आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्याची ही अद्वितीय घटना मावळ तालुक्यात घडली आणि हे भाग्य आपल्या कार्यकर्तृत्वामुळे सरपंच नामदेव शेलार यांनी सिध्द करून दाखविले. आदर्श सरपंच नामदेव शेलार हे गेली 25 वर्षांपासून समाजकारण व राजकारणात सक्रिय असून आतापर्यंत त्यांना तीन वेळा विविध संस्थांनी त्यांच्या कामाची पावती म्हणून आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केले आहे.
25 वर्षापासून राजकारण व समाजकारण करत असताना सलग तीन वेळा आदर्श सरपंच व एक वेळा मुलगी प्रतिमा अक्षय भेगडे हिने आदर्श सरपंच म्हणून काम केले आहे. ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्षेत्रातील डाहूली, कांबरे, आंदर मावळ, बोरवली, वहाणगांव व इतर वाड्या वस्त्यांवर लाईट, पाणी, रस्ते, अंगणवाडी, जि. प. शाळा, व्यायाम शाळा, सभामंडप, होम लाईट, सौर उर्जा लाईट, भजन साहीत्य, बँजो साहीत्य, शालेय साहित्य, सर्व गावातील पटांगण, रस्ते, स्मशानभूमीत, घरकुल, इत्यादी जवळपास 90 टक्के कामे मार्गी लावली आहेत.
तसेच तालुका स्तरावरील राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनेक पदांवर कामे केली असून सध्या मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपसभापती, आदर्श सरपंच ग्रुप ग्रामपंचायत (डाहूली, बोरवली, कांबरे अ मा, वहाणगांव), अंजनी माता मंदिर पंचक्रोशी ट्रस्ट उपाध्यक्ष म्हणून काम करत (Maval) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.