Pune : रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडी या समस्यांसाठी  पुणेकरच उतरणार रस्त्यावर

एमपीसी न्यूज – राज्यात मुंबई खालोखाल पुण्याची ओळख सांगितली (Pune) जाते. आयटी हब, विद्येचे माहेर घर अशा अनेक विशेषणांनी पुण्याचा गौरव केला जातो. मात्र हेच पुणे आता वेगळ्या विषयांसाठी ओळखले जाते ते म्हणजे रस्त्यांवरील खड्डे, पाण्याचे टँकर, वाहतूक कोंडी. वेळोवेळी महापालिकेडे तक्रार देखील नागरिक करतात मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, म्हणूनच पुणेकरांनीच आता रस्त्यावर उतरायचे ठरवले आहे.

यासाठी  9 ऑगस्ट रोजी नागरिक सकाळी दहा वाजता पुणे महापालिका भवनाजवळ गोळा होणार आहेत. यावेळी सर्वजण आपल्या भागातील समस्या एका कागदावर उतरवून त्यावर हस्ताक्षर करुन तो तक्रारीचा कागद महापालिकेला देणार आहेत.

यात प्रामुख्याने शहरातील रस्त्यांवरील खड्डे, साठलेला कचरा, पाणी टँकरचा सुळसुळाट, अरुंद रस्ते, वाहतूक (Pune) कोंडी यावर महापालिकेला जाब विचारला जाणार आहे. यासाठी ट्वीटरवर संशोधक, अभ्यासक अमित सिंग यांनी ट्वीटरवर चलो पीएमसी, पीएमसी घेराव या हॅश टॅगवर मोहीम सुरु केली असून नागरिकांनाही त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Maval : डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत तर सरपंच शेलार यांना समाजभूषण पुरस्कार

याविषयी एमपीसी न्यूज शी बोलताना अमित सिंग म्हणाले की, महापालिकेचे 10 हजार कोटी आहे. रोज 30 कोटी रोज महापालिका खर्च करते त्यातील 1 हजार कोटी केवळ रस्त्यांवर खर्च करते. मात्र फक्त खर्च करुन फायदा नाही त्यासाठी नियोजन व योग्य अमंलबजावणी करणे गरजेचे आहे.

खड्डेमुक्त पुण्यासाठी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी ट्विटर किंवा व्हॉटसअप अशा ऑनालाईन माध्यावरच हि मोहीम सुरु आहे. ज्याला वाघोली, कल्य़ाणीनगर, विमाननगर अशा विविध भागातून प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात सर्वच प्रभागात थोड्या-फार फरकाने या समस्या आहेत.

 

हे सारे चित्र बदलायचे असेल तर महापालिकेत जावे लागेल. यासाठी 9 ऑगस्ट रोजी महापालिकेत नागरिकांच्या सह्यांचे एक पत्र प्रशासनाला सादर करायचे आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होत आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन सिंग यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.