PMAY : पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्यास उरले अवघे चार दिवस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी ( PMAY ) आकुर्डी (मोहननगर) व पिंपरी (उद्यमनगर) येथील गृहप्रकल्पातील 938 सदनिकांसाठी अर्ज करण्यास अवघे चार दिवस उरले आहेत. अर्ज करण्याची मुदत शुक्रवार (दि.28) पर्यंत आहे.

Maval : लोकप्रतिनिधी निधी आणतात पण गुणवत्तापूर्ण कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांची

मोहननगर येथील गृहप्रकल्पात एकूण 568 सदनिका आहेत. तर, उद्यमनगर येथील गृहप्रकल्पात एकूण 370 सदनिका आहेत. हे दोन्ही गृहप्रकल्प तयार आहेत. सदनिकेसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) व दिव्यांग असे आरक्षण आहे.

मोहननगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 35 हजार 255 रुपये आणि उद्यमनगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 92 हजार 699 रुपये स्वहिस्सा भरावा लागेल. त्यासाठी नागरिकांकडून 28 जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली.

Chinchwad : वेदनांना सुगंधित करण्याचे सामर्थ्य  साहित्यात – गिरीश प्रभुणे

आतापर्यंत एकूण 10 हजार 177 नागरिकांनी ऑनलाईन अर्जासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या अर्जासोबत नागरिकांना 10 हजार रुपये अनामत रक्कम व 500 रुपये नोंदणी शुल्क ऑनलाइन भरावे लागतात.

या रकमेसह उद्यमनगर येथील सदनिकांसाठी 1 हजार 358 आणि मोहननगरमधील सदनिकांसाठी 2 हजार 97 अर्ज प्राप्त झाले आहेत. 28 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.

त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तसेच, अर्जदार व त्यांच्या कुटुंबांच्या नावाने देशात घर नसावे. तो शहराचा रहिवाशी असावा, अशी अट ( PMAY ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.