PMC : गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेची शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना आता ऑनलाइन

एमपीसी न्यूज – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (PMC) नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी पुणे महापालिकेने ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना’ सुरू केली. पण, त्यात गैरप्रकार वाढले असून त्याचा मुळात गरिबांना लाभ मिळत नसल्याने महापालिकेने ही योजना आता ऑनलाईन सुरु केली आहे. यामुळे नागरिकांचे महापालिकेत मारले जाणारे हेलपाटेही वाचणार आहेत.

या योजनेसाठी दरवर्षी नव्याने कार्ड काढावे लागते. या वर्षी आत्तापर्यंत 14 हजार कार्ड काढली असून, त्यापैकी 8 हजार नागरिकांची माहिती संगणकावर आली आहे. उर्वरित 6 हजार जणांची कार्ड पुढील आठवडाभरात ऑलाइन दिसणार आहेत, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

यासाठी दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी 12 वर्षांपासून शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबविली जाते. आत्तापर्यंत या योजनेतून 400 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च झाली आहे, तर एक लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी त्याचा लाभ घेतला (PMC) आहे. या योजनेचे कार्ड काढण्यासाठी रहिवासाचा पुरावा, आधारकार्ड, छायाचित्र आणि तहसील कार्यालयामार्फत दिला जाणारा उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक असतो. पण बनावट रेशनकार्ड आणि उत्पन्नाचा दाखला काढून श्रीमंतच याचा गैऱफायदा घेत असल्याने ही प्राणाली आता ऑनलाईन करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.

https://sgy.punecorporation.org/ या संकेतस्थळावर लॉग इन करा –
– हे संकेतस्थळ मराठीत असून, त्यावरील सर्व माहिती व्यवस्थित वाचावी.
– पालिकेचे झोपडपट्टीत राहत असल्याचे ओळखपत्र
– 2010 नंतर सेवा शुल्क भरलेली पावती
– रेशनकार्ड, कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असलेला तहसीलदारांचा दाखला
– जन्म दाखला, कुटुंबातील पात्र सभासदांचे एकत्रित व्हिजिटिंग कार्ड साइजचे दोन फोटो
– सर्व कुटुंबातील पात्र सभासदांचे आधारकार्ड
– ही सर्व कागदपत्रे व फोटो स्कॅन करून अपलोड करून अर्ज सादर करावा लागेल
– कार्ड काढण्यासाठीचे शुल्क ऑनलाइन भरावे लागेल
– ऑनलाइन अर्ज जमा झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून महापालिका भवनात जमा करावी
– कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अर्ज मंजूर होऊन शहरी गरीब कार्डचे ऑनलाइन प्राप्त होईल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.