Talegaon Dabhade : मार्च अखेरपर्यंत 71 टक्के कर वसुलीचे लक्ष्य

एमपीसी न्यूज : मागील नऊ महिन्यांमध्ये (Talegaon Dabhade) केवळ 29 टक्के कर वसुली झाली असून मार्च अखेरपर्यंत उर्वरित 71 टक्के कर वसुली करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनासमोर आहे. जी नऊ महिन्यात झाली नाही, त्याहून अधिक वसुली पुढील तीन महिन्यात करायची असल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने कठोर उपाययोजना करून वसुलीची कडक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, करनिरीक्षक विजय शहाणे, तुकाराम मोरमारे हे विशेष प्रयत्नशील आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मालमत्ता कराची वसुली गेल्या 9 महिन्यात अतिशय अल्प झाली असून शंभर टक्के वसुलीसाठी नगरपरिषद प्रशासनाने कठोर उपाययोजना करून वसुलीची कडक मोहीम हाती घेतली आहे. यावर्षी नगरपरिषदेला सर्व करांच्या माध्यमातून 43 कोटी 24 लाख 3 हजार 905 रुपये वसुली करायची होती. मात्र, आतापर्यंत फक्त 29% टक्के वसुली झालेली आहे.

त्यामुळे पुढील तीन महिन्यात म्हणजे मार्च अखेरपर्यंत सुमारे 71% टक्के वसुली करण्याचे दिव्य आवाहन प्रशासनाच्या समोर उभे ठाकले आहे. त्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, कर निरीक्षक विजय शहाणे, तुकाराम मोरमारे हे विशेष प्रयत्नशील (Talegaon Dabhade) आहेत.

Pune Winter : पुणेकर घेत आहेत गुलाबी थंडीचा आस्वाद; तापमानात एक अंशानी वाढ

मालमत्ता करवसुलीसाठी नगरपरिषद प्रशासनाने दोन वसुली पथके तयार केलेली असून ती थकबाकी धारकाच्या घरोघरी जात आहेत. 50 हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या करदात्यांस अगोदर नोटीशीच्या द्वारे सुचना करून जप्ती करत आहेत. जर जप्तीची नोटीस देऊन देखील मालमत्ताधारकांनी थकीत कर भरला नाही, तर भविष्यात काही मालमत्ताची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगीतले.

नगर परिषदेचे करनिरीक्षक विजय शहाणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात प्रविण शिंदे, आशिष दर्शले, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारी आणि अरविंद पुंडलिक हे वसुलीसाठी आहेत. तर, तुकाराम मोरमारे यांच्या पथकात प्रविण माने, आदेश गरुड, वैशाली आडकर व प्रशांत गायकवाड हे वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत.

यापुढे थकीत मालमत्ता कर दहा हजार रुपयाच्या पुढे असेल तर त्या करदात्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.