Pune Winter : पुणेकर घेत आहेत गुलाबी थंडीचा आस्वाद; तापमानात एक अंशानी वाढ

एमपीसी न्यूज – मागील दोन दिवसांपासून तापमानाचा (Pune Winter) पारा घसरत असताना बुधवारी (दि.11) मात्र तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, पुण्याचे किमान तापमान हे 8.1 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान सरासरी 30 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. ही वाढ झाली असली, तरी नागरिकांना दिलासा मिळाला असे नाही; कारण आजही पुण्याचे तापमान हे महाबळेश्वरच्या तापमानाच्या जवळ जाणारे असल्याने थंडी अजूनही कायम आहे.

थंडीच्या सिजनमधील सर्वाधिक कमी तापमान म्हणजे 7.4 अंश सेल्सिअस तापमान हे काल (मंगळवारी) मोजले गेले होते. या तापमानात आज वाढ झाली असून आज पुण्यातील पाषाण परिसरात सर्वाधिक कमी तापमान हे पाषाण परिसरात नोंदवले गेले आहे, जे किमान तापमान 8.1 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28.9 अंश सेल्सिअस आहे.

इतर भागाचा विचार करायचा झाला, तर शिवाजीनगर परिसरात (Pune Winter) किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअस तर कमाल तपमान 31.3 अंश सेल्सिअस, तळेगाव दाभाडे परिसरात किमान तापमान 10.5 तर कमाल तापमान 30.5 अंश सेल्सिअस, हडपसर परिसरात हेच तापमान 12.1 अंश सेल्सिअस व कमाल 30.8 अंश सेल्सिअस आहे. राजगुरुनगर परिसरात किमान तापमान हे 11.8 अंश सेल्सिएस तर कमाल 31.5 अंश सेल्सिअस, दौड परिसरातही पारा 10.9 अंश सेल्सिअसवर आहे. पिंपरी चिंचवडचा विचार करायचा झाला, तर शहरात पारा हा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

Hasan Mushrif : महाविकास आघाडीला पुन्हा धक्का; नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा

त्यामुळे पुणे व आसपासच्या परिसरात नागरिकांना थंड हवेच्या ठिकाणांचा अनुभव घेता येत असून नागरिकांनी पुन्हा मॉर्निंग वॉकला सुरुवात केली असून गुलाबी थंडी व धुक्याचा आंनद लुटण्यास सुरुवात झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.