PMC Quarntine Guidelines : दुबई, युरोपातून आलेल्यांना 7 दिवस हॉटेल, 7 दिवस होम क्वारंटाईन!

एमपीसी न्यूज : युरोप तसेच दुबईतून मायदेशी परतणाऱ्या सर्व प्रवाश्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असेल. तसेच 7 दिवस हॉटेल त्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्या बाबतच्या मार्गदर्शक नियमावलींचा आदेश पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यानुसार पुणे विमानतळावर युरोपातील देशांमधून तसेच मध्य पूर्व देशांसह दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर स्वॅब टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असणार आहे. ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांना टेस्ट करावी लागेल.

त्यामध्ये कोरोनाग्रस्त आढळल्यास नायडू सांसर्गिक रुग्णालयात दाखल केले जाईल. तसेच चाचणी निगटिव्ह जरी आली तरी 7 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणे बंधनकारक असेल. त्यानंतर 5 ते 7 दिवस होम क्वारंटाईन देखील व्हावं लागेल.

यावेळी प्रवाश्यांना पीएमपीएमएलच्या बसमधून हॉटेलपर्यंत नेण्यात येईल. सर्वांचे पासपोर्ट ताब्यात घेतले जातील. डिस्चार्जच्या वेळी ज्या त्या व्यक्तींना पासपोर्ट पुन्हा दिले जातील.

यासोबतच ज्या प्रवाश्यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये लंडन शहराला भेट दिली, प्रवास केला, त्यांनी देखील क्वारंटाईन व्हावं, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी युरोप, लंडन आणि दुबईतून मोठ्या प्रमाणातून भारतीय नागरीत पुण्या -मुंबईत दाखल होत आहे.

त्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणून याबाबत पुणे महापालिका प्रशासन सज्ज राहणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.