PMRDA: महात्मा फुलेनगर गृह संकुलाचा पुनर्विकास करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने 1992 साली विकसित (PMRDA)केलेला महात्मा फुलेनगर गृह संकुल अनेक समस्यांनी ग्रासले. इमारती मोडकळीस आल्या असून मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विकसित करेल अशी अपेक्षा फुलेनगरवासीयांना आहे.

India : भारत-कझाकस्तान संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात

महात्मा फुलेनगरचा सर्वांगीण विकास हीच येथे राहणाऱ्या (PMRDA)प्रत्येकाच्या मनात आस आहे. ही आस सरकारपर्यंत पोहोचवून पुनर्विकासासाठी लवकरात लवकर पावले उचलावी अशी मागणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महानगर आयुक्ताकडे करण्यात आली आहे. महात्मा फुलेनगरच्या पुनर्विकासासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन पाठिंबा देण्याच्या आवाहन करण्याबरोबरच जनजागृती करणार असे यशवंत कण्हेरे यांनी म्हटले आहे.

पेठ क्रमांक 18 मधील महात्मा फुलेनगर हा मध्यमवर्गीय व औद्योगिक कर्मचारी वसाहत आहे. या ठिकाणी 108 इमारती असून या इमारतींमध्ये जवळपास 1028 कुटुंब गेल्या 31 वर्षांपासून राहत आहेत. सध्या प्राधिकरणाची ही वसाहत मोडकळीस आली असून, या इमारतींची दयनीय अवस्था झालेली आहे. तसेच कुटुंबांचा विस्तार झाल्यामुळे आता येथील रहिवाशांना दाटीवाटीने राहावे लागत आहे.

महात्मा फुलेनगरच्या लोकांना राजकारण नको, तर स्वतःचे हक्काचे सुरक्षित व अत्याधुनिक घर पाहिजे. घराच्या बदल्यात घर पाहिजे, व सुख सुविधा मेळाव्यात यासाठी पीएमआरडीएने महात्मा फुलेनगरच्या विकासासाठी लवकरात लवकर पावले उचलावी, अशी मागणी शिवानंद चौगुले यांनी पत्राद्वारे केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.