Chinchwad : पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या प्रशिक्षणार्थी जवानांची प्रसंगावधानता; सिंहगड रेल्वेला लागलेली आग विझवली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलात प्रशिक्षणार्थी फायरमन म्हणून(Chinchwad) कार्यरत असलेल्या तीन जवानांनी रेल्वे प्रवासात प्रसंगावधानता दाखवली. पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस या रेल्वेला लागलेली आग तत्काळ आटोक्यात आणून जवानांनी कर्तव्यनिष्ठा दाखवली.

सोमवारी (दि. 30) सकाळी पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसने पिंपरी-चिंचवड (Chinchwad)अग्निशमन दलात प्रशिक्षणार्थी फायरमन म्हणून काम करणारे भूपेश पाटील, नितीन ससाणे आणि विजय पाटील प्रवास करीत होते. रेल्वे खंडाला घाटातील पळसदरी येथे आल्यानंतर लायनर गरम झाल्याने ठिणग्या उडू लागल्या. तसेच धूर येऊ लागला.

Maval : मराठा आरक्षणासाठी कार्ला येथे नागरिकांचा जलसमाधीचा प्रयत्न

यावेळी रेल्वेतून प्रवास करणारे ट्रेनी फायरमन यांनी रेल्वेतील अग्निरोधक उपकरणांचा वापर करून आग आटोक्यात आणली. दरम्यान, अचानक धूर येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे रेल्वेचे इंजिन जाम होण्याचा धोका होता. इंजिन जाम झाले असते तर पुणे-मुंबई लोहमार्गावरील रेल्वेसेवा काही काळ ठप्प झाली असती. मात्र पिंपरी-चिंचवडच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना रोखली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.