Pimple Saudagar: अखेर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर विश्वशांती कॉलनी येथील अनेक वर्षापासून (Pimple Saudagar)रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी माजी नगरसेवक नाना काटे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले.

पिपंळे सौदागर येथील विश्वशाती कॅालनी नंबर 6 येथील(Pimple Saudagar) रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले होते. कॅालनी मधील नागरिकांना चालताना व वाहतुक करताना अनेक समस्येला सामोरे जावे लागत होते, याची तक्रार नागरिकांनी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व माजी नगरसेविका शितल नाना काटे यांच्याकडे केली होती.

PMRDA: महात्मा फुलेनगर गृह संकुलाचा पुनर्विकास करण्याची मागणी
या तक्रारीची दखल घेत महापालिका स्थापत्य विभागाला सांगून येथे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे अशा सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सोमवारी विश्वशाती कॅालनी नंबर 6 मधील रस्त्याचे डांबरीकरण करणाच्या कामास सुरूवात करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.