Maratha Reservation :आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक, गाड्याही जाळल्या

एमपीसी न्यूज : माजलगाव येथे आक्रमक मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी (Maratha Reservation)अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. , सोळंकेंच्या बंगल्या समोर उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांनी जाळल्या आहे.

प्रकाश सोळंकेंनी मनोज जरांगे पाटील बाबत केलेल्या वक्तव्यामुळे (Maratha Reservation) मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली.

Pimple Saudagar: अखेर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

सोशल माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.(Maratha Reservation एका मराठा आंदोलकाने आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आहे.मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. यात बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. याचा निषेध म्हणून प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावर आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली.

आंदोलकांनी सोळंकेंच्या बंगल्या समोरील गाड्याही जाळल्या. त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके घरातच उपस्थित होते.
बंगल्यामधून धुराचे लोळ येत असल्याचं दिसत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.