PMRDA : रिंगरोड मार्गी लागणार; वडगाव शिंदेमध्ये  मोजणी सुरु

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील ( PMRDA ) प्रस्तावित 88.13 किमी लांबीच्या इनर रिंगरोडचे विकसन टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजित असून पहिल्या टप्प्यात सोलू ते वाघोली (पुणे – नगर रोड पर्यंत) चे काम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी वडगाव शिंदेमध्ये रिंगरोडची मोजणी सुरु केली आहे.

Breaking News : संसदेचे कामकाज सुरु असताना अचानक सभागृहात एकाची उडी

पहिल्या टप्प्यातील सोलू व वाघोली रस्त्यामुळे पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे ते नगर रस्ता रस्ते रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) रिंगरोड द्वारे जोडला जाईल. त्यामुळे, शहरांतर्गत वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

त्याचप्रमाणे, सोलू ते वडगाव शिंदे हा रिंगरोडचा भाग जो पुणे महापालिका हद्दीपर्यंत आहे. तो, प्राधिकरणामार्फत विकसित करण्यात येणार आहे. तर, पुणे महापालिका हद्दीतील वडगाव शिंदे ते लोहगाव ते वाघोली हा रिंगरोडचा भाग 5.70 किलोमीटर पुणे महापालिका विकसित करणार आहे.

पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाअंतर्गत सोलू, वडगाव शिंदे व निरगुडी या गावातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत वडगाव शिंदे येथील प्रकल्पात बाधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.

त्यात स्थानिक लोकांनी रिंगरोडला जमिन देण्यास सहमती दर्शविली आहे. मौजे वडगाव शिंदे येथील एकूण 5.71 हेक्टर एवढे क्षेत्रफळ रिंगरोडने बाधित होत असून त्याची संयुक्त मोजणी  सुरळीतपणे सुरु ( PMRDA ) झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.