Dehuroad : देहूरोड येथून पाकिटमाराला अटक

एमपीसी न्यूज – भाजी घेणाऱ्या ग्राहकाचे (Dehuroad) पाकीट चोरणाऱ्या पाकिटमाराला नागरिकांनी शिताफीने पकडले व देहूरोड पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार देहूरोड येथे रविवारी (दि.16) सवाना चौक येथे घडला आहे.

सतीश काकासाहेब काकडे (वय 24 रा.किवळे) असे अटक आरोपीचे नाव असून राजेंद्र दत्तात्रय चव्हाण (वय 38 रा. रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह भाजी (Dehuroad) घेण्यासाठी जात होते. यावेळी आरोपीने पाठीमागून येवून धक्का मारला. यावेळी त्याने फिर्यादी यांचे पाकीट मारेल ज्यामध्ये अडीच हजार रोख रक्कम होती. तो पळून जात असताना लोकांच्या मदतीने पकडून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. देहूरोड पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.