Pavana River : पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Pavana River ) पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 21) दुपारी दीड वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस अंमलदार मितेश यादव यांनी या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर दोन महिलांनी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची भट्टी लावली असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी (Pavana River ) पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 10 लाख 10 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.