Prostitution Crime : धमकी देत महिलेला वेश्याव्यसायासाठी जबरदस्ती करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – धमकी देत महिलेला वेश्याव्यवसाय (Prostitution Crime) करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार  27 व 28 ऑगस्ट 2022 या कालावधीत निगडी येथे घडला आहे.

याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून किसन भानुदास शेळवणे (वय 40 रा. तळवडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : आठ लाखाचे 19 लाख देऊनही खाजगी सावकाराने धमकी दिल्यामुळे तरुण बेपत्ता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला (Prostitution Crime) खासगीत बोलायचे आहे, म्हणून निगडी येथे बालावून फिर्यादी सोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. तसेच, त्यांना मी म्हणेल त्या व्यक्तीशी शरीर संबंध ठेवावे लागतील, नाही तर तुला व तुझ्या मुलींना मारून टाकेन अशी धमकी दिली. तसेच त्याच्या कारमध्ये बसवून मारहाण करत सोडून दिले. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.