Pune Crime : आठ लाखाचे 19 लाख देऊनही खाजगी सावकाराने धमकी दिल्यामुळे तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज : खाजगी सावकाराकडून घेतलेल्या (Pune Crime) आठ लाख रुपयांच्या बदल्यात 19 लाख रुपये देऊनही आणखी पैसे द्यावे यासाठी धमकावणाऱ्या सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुण बेपत्ता झाला आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात हा तरुण राहत होता. त्या तरुणाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित सावकार या विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराग गायकवाड (वय 40, लक्ष्मी नगर पर्वती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खाजगी सावकाराचे नाव आहे. अमोल इचगे असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अर्चना अमोल इचगे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल इचगे यांनी पराग गायकवाड यांच्याकडून व्यवसायासाठी 12 व 15 टक्के व्याज दराने अंदाजे आठ लाख रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात वेळोवेळी 19 लाख रुपये इतकी रक्कम परतही केली. मात्र, इतकी रक्कम देऊनही आरोपीकडून आणखी नऊ लाख (Pune Crime) रुपये देण्याची मागणी केली जात होती. पैसे दिले नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देखील त्यांनी दिली होती. या धमकीला कंटाळून अमोल इचगे हा तरुण 8 ऑक्टोबरपासून घर सोडून निघून गेला आहे. त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.