Pune Crime : हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना हटकल्याने तरुणावर कोयत्याने वार; पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त (Pune Crime) महिला आणि मुली दांडिया खेळत असताना त्या ठिकाणी येऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना हटकल्याने तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. बिबवेवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. 
मोहित उर्फ सुनील माणिक दातरंगे (वय 22) आणि आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार अनिल कदम यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसागर नगर परिसरातील कदम चाळ या ठिकाणी फिर्यादी आणि त्यांच्या परिसरातील काही महिला आणि मुली दांडिया खेळत होते. यावेळी आरोपी त्या ठिकाणी येऊन हुल्लडबाजी करू लागले. यावेळी फिर्यादी तरुणांनी त्यांना हाकलून लावले. याचाच राग मनात धरून काही वेळाने आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आले.
त्यांनी फिर्यादीला दमदाटी करत आम्ही इथले भाई आहोत (Pune Crime) आणि तुम्ही आम्हाला हाकलून देता थांबा आता मला खल्लास करतो असे म्हणून एका आरोपीने धारदार हत्यार काढून फिर्यादीच्या कपाळावर आणि हातावर मारले. तर, फिर्यादीचा मित्र योगेश याच्या डोक्यावर देखील मारहाण केले. त्याशिवाय लाथा बुक्क्यांनी मारहाण करत स्वीकारही केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.