Yerawada : येरवड्यातील मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

एमपीसी न्यूज : येरवडा (Yerawada) येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर येथीलच एका मनोरुग्णांनी अत्याचार केले आहे. 8 सप्टेंबर आणि 7 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी अनिकेत श्रीकांत गोखले (वय 24) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातील परिचर धनराज गणपत सोनवणे (वय 58) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी (Yerawada) अधिक माहिती अशी की, सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत होता. तर, आरोपी अनिकेत गोखले हा मनोरुग्ण आहे. त्याने मनोरुग्णालयामध्येच अल्पवयीन मुलावर दोन वेळा अनैसर्गिक अत्याचार केला. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.