Punawale News : पुनावळे मधील कोयते, काटे वस्ती येथील रस्त्याची दुरवस्था, अपघातांना निमंत्रण

एमपीसी न्यूज – पुनावळे मधील कोयते आणि काटे वस्ती येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत, या खड्यांत पावसाचे पाणी साठत असून, त्यामुळे वाहन चालक घसरुन पडत असल्याच्या घटना घडत आहेत.

रस्त्यावर माती आणि पाणी साचून राहिल्याने रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे दुचाकी चालक घसरुन खाली पडत आहेत तसेच इतर लहान वाहनांना रस्त्यातील खड्यातून वाट काढावी लागत आहे. रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचल्याने हा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे.

स्थानिक नागरिक अपूर्व पुनीवाला यांनी सांगितले की, ‘मागील एक ते दीड महिन्यापासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत पालिकेच्या सारथी ॲपवर तक्रार दाखल करण्यात आली. पण, तात्पुरती माती टाकून खड्डे बुजवण्यात आले. काही दिवासांत माती निघून पुन्हा खड्डे उघडे पडले आहेत व त्यामध्ये पाणी साचले आहे. या खराब रस्त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.’

संबंधित प्रशासनाने लक्ष घालून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.