Pune : ‘बाईपण भारी देवा’ म्हणत कलापिनी महिला मंचचा वर्धापन दिन दणक्यात साजरा

एमपीसी न्यूज : ‘बाईपण भारी देवा’ म्हणत कलापिनी महिला मंचचा वर्धापन दिन (Pune) उत्साहात साजरा झाला. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या, तळेगावच्या नामांकित डॉ. मेघा सोनावणे आणि डॉ. दिपाली झवर त्याचबरोबर डॉ. अनंत परांजपे, अंजली सहस्रबुद्धे, डॉ .अश्विनी परांजपे, डॉ. मीनल कुलकर्णी आणि डॉ. विनया केसकर ह्यांच्या हस्ते झाली. डॉक्टर मीनल कुलकर्णी ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

डॉ. मेघा सोनावणे आणि डॉ. दिपाली झवर यांचा परिचय डॉ. अश्विनी परांजपे ह्यांनी करून दिला, तर महिला मंचचा वर्षभरातील कार्यक्रमांचा आढावा कलापिनीच्या कर्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे यांनी दिला.

कलापिनीच्या कार्यक्रमांच्या वेळेला प्रमुख पाहुण्यांना जे आकर्षक कागदी पुष्पगुच्छ भेट म्हणून देतात ते तयार करणाऱ्या महिला मंचच्या सदस्यांचा गौरव करण्यात आला.

ज्योती गोखले यांनी आपल्या मनोगतात, महिला मंचामुळे आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल सांगितला.प्रमुख पाहुण्या डॉक्टर मेघा सोनावणे आणि डॉक्टर दिपाली झवर ह्यांनीही महिला मंचच्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या उपक्रमांचे खूप कौतुक केले आणि अशीच पुढे प्रगती होऊ दे अश्या शुभेच्छा दिल्या. डॉ. विनया केसकर ह्यांनी सर्वांचे आभार मानले. ह्या पहिल्या सत्राचे सुंदर आणि समर्पक निवेदन विद्या अडसुळे यांनी केले.

ह्या नंतर महिलांचे कलागुण दाखवण्यासाठी, सरस्वती वंदना अनघा कुलकर्णी यांनी सादर केले. ‘सांगड’ हे मिलिंद खरात लिखित आणि प्रियंका हांडे आणि विजय कुलकर्णी दिग्दर्शित नाटक उत्तम रित्या सादर करण्यात आले. नवी पिढी आणि जुनी पिढी यांच्या विचारांची सांगड घातली तर अनेक प्रश्न सहज सुटू शकतात हा विचार या नाटकाने दिला.

Hinjawadi : हिंजवडीमधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

यात ज्योती गोखले, केतकी लिमये, ज्योती ढमाले, मीरा कोन्नुर, शुभांगी देशपांडे, दिपाली जोशी आणि सायली रौंधळ यांनी उत्तम रीतीने काम केले. ‘प्रवास – स्त्री जीवनाचा’ हा आदिती अरगडे दिग्दर्शित सुंदर नृत्याविष्कार सादर करून सर्व महिलांनी प्रेक्षकांची मने जिंकली. राखी भालेराव, कीर्ती देसाई, विशाखा देशमुख, माधवी एरंडे, मीनल साळुंखे, प्रीती शिंदे,नंदिनी काळे यांनी छान सादरीकरण केले.

ह्या सर्व नृत्यांना एकत्र गुंफून स्त्रीचा प्रवास आपल्या ओघवत्या निवेदनात लीना परगी ह्यांनी (Pune) दाखविला. महिलांचा लेखन गुण त्यांनी लिहिलेल्या मनोगतातून तर त्यांच्यातील हस्तकला आणि चित्रकला दिसली. ती स्टेजच्या सुंदर बॅकड्रॉप सजावटीमधून वर्षभरातील उपक्रमांची एक फोटो वॉल तयार करून सर्वांच्या आठवणींना उजाळा दिला गेला.

कार्यक्रमाला कलापिनीचे सचिव हेमंत झेंडे आणि सहसचिव विनायक भालेराव सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू आणि स्टेज व्यवस्था शार्दुल गद्रे, प्रतीक मेहता, अभिलाष भवर आणि प्रणव केसकर ह्यांनी उत्तम रित्या सांभाळली.

कलापिनीच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेऊन हा स्त्री सोहळा अत्यंत प्रभावीपणे साजरा केला. प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद ह्या कार्यक्रमाला मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.