Pune : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात समाजवादी पार्टीचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज- पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस दरवाढीमुळे भाजप सरकारचा निषेध करत समाजवादी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालय विधानभवन पुणे येथे सोमवारी (दि.25) धरणे आंदोलन केले.

यावेळी पिंपरी चिंचवड समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी, सालारभाई शेख, रवी यादव, विजू रोशन, विनोद भालेराव आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

समाजवादी पार्टी हा सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी नेतृत्व करणारा राष्ट्रीय पक्ष आहे. सामान्य नागरिकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत भाजप सरकारने केंद्रात सत्ता मिळवली. भाजपने अच्छे दिन आयेंगेच्या आश्वासनाचा अजेंडा ते विसरले आहेत. जनतेची पिळवणूक करण्याकरिता भाजप सरकारने महागाई, जी.एस.टी, पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅसमध्ये दरवाढ केली असून सामान्य नागरिकांना जीवन जगणे अवघ़ड झाले आहे. त्यामुळे हे दर कमी करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरव राव याना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.