Nigadi : एलआयसीच्या हीरक महोत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – लाइफ इन्शुरेंस ऑफ इंडियाच्या हिरक महोत्सवी वर्षा निमित निगडी शाखेच्या वतीने एस बी पाटील पब्लिक स्कूल या शाळेतील पाचवी ते दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी एलआयसी निगडीचे शाखाधिकारी बाळासाहेब हुले, वीरेंद्र बात्रा, सहाय्य्क विभागीय अधिकारी गुणवंत बोराळकर, विकासाधिकारी श्रीकांत घोडके, उद्योजक बाळकृष्ण उ-हे, शाळेच्या मुख्याध्यापिका मधुबाला गायरोला, परीवेक्षक पद्मावती बंडा आदी उपस्थित होते. कृतिका गुप्ता (इयता पाचवी), मेघना सांगळे (इयता सहावी), राजलक्ष्मी जमदाडे (इयता सातवी), कनक जोशी (इयता आठवी) व आदेश टाकळकर (इयता नववी) या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

जनतेचा दृढ विश्वास आणि पाठबळाच्या जोरावर एलआयसी 61 व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. या हीरक महोत्सवी वर्षा निमित्त देशाच्या भविष्याचा सन्मान सोहळा आजच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करून करण्यात आला. प्रयत्नांमधील सातत्यात यश दडलेले आहे, असे बाळासाहेब हुले म्हणाले.

मुख्याध्यापिका मधुबाला गायरोला म्हणाल्या की, एलआयसीने अभ्यासात हुशार व अव्वल विद्यार्थ्यांना विद्यार्थांना प्रेरित करण्यासाठी पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देण्यास पुढाकार घेतल्याने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून भवितव्य जोपासण्यास मदत होईल.

विकासाधिकारी श्रीकांत घोडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्याक्रमचे नियोजन उद्योजक बाळकृष्ण उ-हे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.