Pune: संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या शिबिरात 72 जणांनी केले रक्तदान

Pune: 72 people donated blood in the camp of Sant Nirankari Charitable Foundation पुण्यातील संत निरंकारी सत्संग भवन, फॉरेस्ट पार्क सोसायटी, चंदननगर येथे रविवारी सकाळी 8 ते 1 या वेळेत रक्तदान शिबिर झाले

एमपीसी न्यूज- संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 72 जणांनी रक्तदान केले.

पुण्यातील संत निरंकारी सत्संग भवन, फॉरेस्ट पार्क सोसायटी, चंदननगर येथे रविवारी सकाळी 8 ते 1 या वेळेत रक्तदान शिबिर झाले. यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढीने 72 युनिट रक्त संकलन केले.

कोरोना विषाणूने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या असून याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे.

या परिस्थितीचा आढावा घेऊन तसेच ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे जय-जवान-नगर, चंदननगर या ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडले.

रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच फिजिकल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष देण्यात आले.

जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा निरंकारी मिशन सेवेसाठी तत्पर असते. सध्य परिस्थितीमध्ये निरंकारी मिशन द्वारे पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना रेशन वाटप करण्यात आले.

गेल्या वर्षी अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानाच्या वेळी निरंकारी मिशनचे सेवेदार सेवेसाठी धाऊन गेले होते.

शिवाजी ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर पार पडले. शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चॅरिटेबल, सेवादलच्या सर्व स्वयंसेवकांचे मोठे योगदान लाभले. याच प्रकारचे रक्तदान शिबीर रविवार दि. 28 जून रोजी पेरणे-फाटा आणि रविवार दि. 5 जुलै रोजी आव्हाळवाडी येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.