India Corona Update: नवा उच्चांक! 24 तासांत 14,821 नवे रूग्ण, 425 जणांचा मृत्यू

India Corona Update: New highs! In 24 hours, 14,821 new patients, 425 died and 2,37,196 recovered देशात 13,699 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत रुग्ण संख्येने नवा उच्चांक गाठला असून 14,821 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रूग्णांची संख्या 4,25,282 वर जाऊन पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 425 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात 13,699 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


देशातील 4,25,282 एकूण बाधित रुग्णांपैकी 1,74,387 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 2,37,196 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील 24 तासांत देशभरातील 9,440 कोरोनामुक्त रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

सर्वाधिक रुग्ण संख्या असलेली पाच राज्य (कंसात मृत्यू)

महाराष्ट्र – 1,32,075 ( 6,170)

दिल्ली – 59,746 (2,175)

तमिळनाडू – 59,377 ( 757)

गुजरात – 27,260 (1663)

उत्तर प्रदेश – 17,731 ( 550)

उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 50 हजारांहून अधिक आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 55.49 टक्क्यांवर पोहोचले आहे.

दिल्लीमध्ये वाढणारी रुग्णांची संख्या पाहता केंद्र सरकारने दिल्लीमधील कंटेनमेंट झोन नव्याने घोषित करण्यास सांगितले आहेत. तसेच कंटेनमेंट झोन बाहेरील घरांचे सर्वेक्षण करावे व दिल्लीमध्ये वीस हजार सेरोलॉजिकल सर्व्हे करावेत.

उपचार सुलभ व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्या मोठ्या रुग्णालयाशी जोडावा अशा सूचना निती आयोगाच्या डॉक्टर व्ही के पॉल यांच्या समितीने दिले आहेत.

चेन्नईमधील रुग्णसंख्या 40 हजाराच्या पुढे गेली असून तिथे 30 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे‌. 1 जूनपासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्यापासून दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची वाढ होत असून रुग्ण संख्येचा दररोज नवा उच्चांक समोर येत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.