BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सीमा शुल्क विभागाकडून 800 किलोचा गांजा जप्त; दोघांना अटक

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ओरिसाहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पकडून तब्बल 70 लाखांचा 800 किलो गांजा जप्त केला. हडपसर येथे सापळा रचून गुरुवारी (दि.10) ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी बाबू सिंग (वय 30, रा. मुळ- राजस्थान), शैलेश राव (वय 26,रा.ओरिसा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओरिसाहून येणाऱ्या कंटेनर (आर जे 02 जीए 1691) मधून मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला बुधवारी (दि.9) सकाळी मिळाली होती. त्यानुसार पथकाने हडपसर येथे सापळा लावला आणि कंटेनर थांबवून त्याची झडती घेतली. त्यावेळी कंटेनरमध्ये 800 किलो गांजा आढळून आला. पथकाने हा गांजा जप्त करून दोघांना अटक केली.
मिळालेला गांजा सीमा शुल्क विभागाच्या गोदामात ठेवण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास पथकाकडून सुरु आहे. पुण्यात केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.

ही कारवाई आयुक्त राजीव कपूर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गोयल, सहआयुक्त राजेश रामराव, अधीक्षक अलेक्झांडर लई यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख, निरीक्षक मुकेश कुमार, हेड हवालदार सुनील कांबळे, संजय पिल्ले, भारत पवार, संजय पिंगळे यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.