Pune : पुण्यात 21 हजार दिव्यांमधून साकारली रामाची तेजोमय प्रतिकृती,  हजारो लखलखत्या दिव्यांनी श्रीराम मंदिर उजळले

एमपीसी न्यूज –  अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ( Pune) संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भव्य भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो पुणेकरांनी एकत्र येत 21 हजार दिव्यांनी प्रभू श्रीरामाची तेजोमय प्रतिकृती साकारण्यात आली. हजारो दिव्यांनी, आकर्षक व नयनरम्य आतषबाजीने श्रीराम मंदिर परिसर उजळून निघाला.

Chikhali : जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा रंगला

टिळक रस्त्यावरील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या श्रीरामनगरीमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून तीन दिवस ‘अपने अपने राम’ रामकथेचे श्रवण केल्यानंतर आज सोमवारी हजारो पुणेकरांनी भव्य दीपोत्सव साजरा केला. २१ हजाराहून अधिक लखलखत्या दिव्यांपासून सूर्याच्या व कमळाच्या आकृतीमध्ये तेजोमय ‘श्रीराम’ अशी रामाची प्रतिकृती साकारली होती. या अशा अभूतपूर्व उपक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून दीप प्रज्वलीत केले. रामगीते, रामनामाचा जयघोष, रामाची आराधना यामुळे परिसर भक्तिमय झाला होता.

‘जय श्री राम’, ‘सियावर रामचंद्र की जय’ ‘श्रीराम जय राम जय जय राम’ अशा उद्घोषांनी परिसर दुमदुमला होता. राम मंदिराच्या प्रतिकृतीवर झालेला लेझर शो आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी झालेल्या गंगा घाट आरतीने भक्तिरसाची अनुभूती दिली.

अयोध्येतील श्रीरामांची मूर्ती साकारताना स्थापित केलेल्या समितीमधील ज्येष्ठ मूर्तिकार डॉ. गो. बं. देगलूरकर, निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, संयोजक मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ यांच्या हस्ते दीपोत्सवातील पहिला दिवा प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर हजारो महिलांनी दिवे प्रज्वलित ( Pune) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.