Pune : गीता धर्म मंडळातर्फे भव्य गीता पाठ महायज्ञाचे यशस्वी आयोजन

एमपीसी न्यूज – गीता धर्म मंडळ पुणे या संस्थेच्या शताब्दी (Pune )महोत्सवानिमित्त आज गीतापाठ महायज्ञ आयोजित केला होता. या महायज्ञामध्ये संपूर्ण जगभरातून दहा हजार आठशे साधक प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या सर्व साधकांनी संपूर्ण श्रीमद् भगवद्गीतेचे १८ अध्याय एक सुरात सलग गायले. या साधकांमध्ये अडीच हजार साधकांचे गीता अध्याय कंठस्थ होते.

यावेळी सर्व साधकांचे स्वागत करताना गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार यांनी आज या मैदानावर भक्ती सागर उसळून आलेला आहे असे सांगितले. गीता धर्म मंडळातर्फे हा पहिलाच प्रयत्न असून तो सर्व साधकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण यशस्वी झाला आहे असे त्यांनी नमूद केले.

Pune : द्विराष्ट्र वादाला विरोध केल्याने गांधींची हत्या: शमसुल इस्लाम

एका ठिकाणी एका वेळेला दहा हजार पेक्षा जास्त( Pune )साधकांनी गीता पठण करणे हा एक विक्रम असून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे असे आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या डॉक्टर चित्रा जैन यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार, कार्यवाह विनया मेहेंदळे, सहकार्य वाह प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, शताब्दी महोत्सव संयोजक ह भ प मोरेश्वर बुवा जोशी आणि इतर सर्व पदाधिकारी यांना आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सन्मानचिन्ह देण्यात आले.

या उपक्रमास पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, उपायुक्त संदीप गिल, डॉ. देगलूरकर, प्रा. मेधा कुलकर्णी, हेमंत रासने, प्रदीप गारटकर, अभय माटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यवाह विनया मेहेंदळे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.