Pune : प्रोजेक्ट टायगर’ सुवर्ण महोत्सवानिमित्त स्पर्धांचे पारितोषिक वितरण

एमपीसी न्यूज – भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या (Pune)जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला’ पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘जीविधा’ संस्थेतर्फे निबंध, चित्रकला आणि पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांचे पारितोषिक वितरण आज यशवंतराव चव्हाण कलादालन,कोथरूड येथे झाले.

29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीत यशवंतराव (Pune)चव्हाण कलादालन, कोथरूड, पुणे येथे ‘व्याघ्र प्रकल्पाची पन्नास सोनेरी वर्षे’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाद्वारे वाघांच्या संवर्धनात ‘ व्याघ्र प्रकल्पांची’ भुमिका , स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, व्याघ्र प्रकल्पांसमोरील भावी काळातील आव्हाने यासारख्या विषयांची माहिती पोस्टरद्वारे करून दिली जात होती.

Pune : भारतीय संविधान हा सुशासनाचा आदर्श वस्तुपाठ

विजेत्यांचा सत्कार

वन्यजीव संवर्धनाच्या ‘प्रोजेक्ट टायगर’या यशस्वी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाचे कौतुक करण्यासाठी ‘जीविधा’ संस्थेतर्फे यावर्षी प्रौढांसाठी पोस्टर स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या विजेत्यांना प्रशस्तीपत्रक आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.

विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे:

निबंध स्पर्धा :उत्कर्षा दोरगे (प्रथम क्रमांक),विजया कोळेकर(द्वितीय क्रमांक), ऐश्वर्या गडदे(तृतीय क्रमांक)

पोस्टर स्पर्धा :शताक्षी वनारसे(प्रथम क्रमांक),अनुराधा दुशी(द्वितीय क्रमांक), क्रांती जरांडे(तृतीय क्रमांक)

चित्रकला स्पर्धा : रुद्र महाबळेश्वर(प्रथम क्रमांक), मानसी मालजी(द्वितीय क्रमांक),ईशिता रेगे(तृतीय क्रमांक)

यावेळी बोलतांना माजी नगरसेविका सौ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या , ‘डोळ्यात अंजन घालणारे आणि प्रेरणा देणारे हे प्रदर्शन आहे. मुलांच्या संस्कारक्षम वयात असे कार्यक्रम करणे आणि त्यांचा त्यामध्ये सहभाग वाढणे गरजेचे आहे. आपण पृथ्वीला ओरबाडत आहोत, निसर्गाचा ऱ्हास थांबला पाहिजे. वाघांचे जतन केलं पाहिजे. पुढच्या पिढीसाठी हे ज्ञान पोहचवणे गरजेचे आहे .त्यासाठी जिविधा संस्थेचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे.

किरण यज्ञोपवीत म्हणाले, ‘ जिविधाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मानवी कल्याणाचा विचार हे वाक्य रद्द करून निसर्गाच कल्याण करणं हा विचार पुढे यायला पाहिजे . निसर्ग संवर्धनासाठी माणसाला सुजाण आणि सुज्ञ होणं गरजेचे आहे. जागृती आणि शिक्षण या विषयाला धरून ‘ जिविधा ‘ संस्थेचे कार्य सुरू असते’. ‘जैवविविधतेकडे सजगतेने समाजाने पाहिले पाहिजे’ असे संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.